Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >गुंतवणूक > तुमच्या पोर्टफोलिओमध्ये किती सोनं ठेवावं? '५ ते १५% फॉर्म्युला' समजून घ्या; अस्थिरतेत बचत राहील सुरक्षित!

तुमच्या पोर्टफोलिओमध्ये किती सोनं ठेवावं? '५ ते १५% फॉर्म्युला' समजून घ्या; अस्थिरतेत बचत राहील सुरक्षित!

Gold investment rule: सोने आता फक्त दागिन्यांची वस्तू राहिलेली नाही, तर एक शहाणपणाची गुंतवणूक आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 16:21 IST2025-10-30T15:40:40+5:302025-10-30T16:21:00+5:30

Gold investment rule: सोने आता फक्त दागिन्यांची वस्तू राहिलेली नाही, तर एक शहाणपणाची गुंतवणूक आहे.

Investment Portfolio How Much Gold Should You Hold to Hedge Against Rupee Devaluation and Market Crash? | तुमच्या पोर्टफोलिओमध्ये किती सोनं ठेवावं? '५ ते १५% फॉर्म्युला' समजून घ्या; अस्थिरतेत बचत राहील सुरक्षित!

तुमच्या पोर्टफोलिओमध्ये किती सोनं ठेवावं? '५ ते १५% फॉर्म्युला' समजून घ्या; अस्थिरतेत बचत राहील सुरक्षित!

Gold investment rule : एकेकाळी फक्त लग्न आणि सणांना खरेदी केले जाणारे सोने आता गुंतवणुकीचा एक महत्त्वाचा पर्याय बनले आहे. २०२५ या वर्षात सोन्याने शेअर बाजारापेक्षाही जास्त परतावा दिला आहे. ऑक्टोबरमध्ये तर सोन्याच्या किमतीने उच्चांक गाठला. अशा तेजीच्या काळात गुंतवणूकदारांसमोर सर्वात मोठा प्रश्न असतो की, आपल्या एकूण पोर्टफोलिओमध्ये किती टक्के सोनं ठेवावं? तज्ज्ञांच्या मते, याचे उत्तर सोपे आहे '५ ते १५% फॉर्म्युला'.

'५ ते १५%' चा फॉर्म्युला काय आहे?
हा फॉर्म्युला सांगतो की, तुमच्या एकूण गुंतवणुकीच्या मालमत्तेचा हिस्सा, तुमच्या जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार सोन्यामध्ये असावा.
| जोखीम घेण्याची क्षमता  | सोने किती ठेवावे |
| जास्त जोखीम (उदा. तरुण गुंतवणूकदार, शेअर बाजारात सक्रिय) | ५% |
| मध्यम/कमी जोखीम (उदा. निवृत्तीच्या जवळ असलेले) | १०% ते १५% |

जोखीम घेण्याची क्षमता  सोने किती ठेवावे 
जास्त जोखीम (उदा. तरुण गुंतवणूकदार, शेअर बाजारात सक्रिय) ५% 
मध्यम/कमी जोखीम (उदा. निवृत्तीच्या जवळ असलेले) १०% ते १५% 


सोने भलेही शेअर बाजाराप्रमाणे त्वरित आणि मोठे रिटर्न देत नाही, पण बाजारात मोठी घसरण झाल्यास ते तुमच्या पोर्टफोलिओला स्थिरता देते आणि मोठे नुकसान होण्यापासून वाचवते.
उदाहरण तुमचा एकूण पोर्टफोलिओ २० लाखांचा असेल, तर तुम्ही १ लाख (५%) ते ३ लाख रुपयांपर्यंत (१५%) सोनं खरेदी करू शकता.

रुपया घसरला की सोनं वधारतं
भारतात सोन्याच्या किमतीवर रुपयाच्या मूल्याचा मोठा परिणाम होतो. ऑक्टोबर २०२५ मध्ये रुपया डॉलरच्या तुलनेत ८८.८ रुपयांच्या ऐतिहासिक नीचांकी पातळीवर पोहोचला होता. जेव्हा रुपया घसरतो, तेव्हा सोनं महाग होतं. यामुळेच, शेअर बाजार अस्थिर असताना सोने तुमच्या गुंतवणुकीचे रक्षण करते.

सोन्यात गुंतवणुकीचे पर्याय: ETF, SGB की फिजिकल?

गुंतवणुकीचा प्रकार फायदा कर लाभ
गोल्ड ETF / म्युच्युअल फंड डीमॅट खात्यातून शेअरप्रमाणे खरेदी-विक्रीची सोय. डिजिटल गुंतवणूक. एक वर्षापेक्षा जास्त काळ ठेवल्यास १२.५% LTCG (दीर्घकालीन भांडवली लाभ कर) लागू होतो. 
 सॉव्हरेन गोल्ड बाँड प्रत्येक वर्षी २.५% व्याज मिळते. मॅच्युरिटीवर (८ वर्षांनी) पूर्ण रक्कम करमुक्त असते. सर्वात उत्तम आणि सुरक्षित पर्याय (पण, सध्या उपलब्ध नाही.)
फिजिकल गोल्ड (दागिने/बिस्किटे) मेकिंग चार्जेस (घडणावळ), GST आणि सुरक्षित साठवणुकीचा धोका असतो. डिजिटल सोन्यापेक्षा तुलनेत कमी फायदेशीर. 

५ ते १५% चा नियम कसा लागू कराल?
तुमच्या जोखीम क्षमतेनुसार सोन्यात किती टक्के (उदा. १०%) गुंतवणूक करायची, हे ठरवा.
एकाच वेळी मोठी रक्कम गुंतवण्याऐवजी, एसआयपीप्रमाणे हळूहळू, दर काही महिन्यांनी सोन्यात गुंतवणूक वाढवा.
वर्षातून एकदा तुमच्या पोर्टफोलिओचे मूल्यांकन करा. जर सोन्याचा हिस्सा १५% च्या वर गेला असेल, तर नफा घेऊन तो हिस्सा कमी करा, जेणेकरून तुमच्या गुंतवणुकीतील संतुलन कायम राहील.

वाचा - टॅक्स स्लॅबमध्ये मोठा बदल होणार? ५० लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर '३०% टॅक्स' नको; उद्योग संघटनेची मोठी मागणी

या फॉर्म्युल्यामुळे तुम्ही बाजारातील चढ-उतारांपासून सुरक्षित राहाल आणि दीर्घकाळात स्थिर आर्थिक वृद्धी साधू शकाल.

Web Title : सोने में निवेश: 5-15% नियम से पोर्टफोलियो को सुरक्षित करें।

Web Summary : विशेषज्ञ जोखिम क्षमता के आधार पर पोर्टफोलियो का 5-15% सोना आवंटित करने की सलाह देते हैं। सोना बाजार में गिरावट के दौरान स्थिरता प्रदान करता है और रुपये के मूल्यह्रास से बचाता है। संतुलित विकास के लिए ईटीएफ, एसजीबी, या भौतिक सोने पर विचार करें।

Web Title : Gold investment: Secure your portfolio with the 5-15% rule.

Web Summary : Experts advise allocating 5-15% of your portfolio to gold, depending on your risk tolerance. Gold provides stability during market downturns and protects against rupee depreciation. Consider ETFs, SGBs, or physical gold, weighing their benefits and tax implications for balanced growth.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.